धरण, नदी व घाट



नीरा नदी
कृष्णा नदीच्या भीमा ह्या उपनदीची उजवीकडील महत्त्वाची उपनदी. ही पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यात, सह्याद्रीच्या डोंगररांगांत उगम पावते. पूर्वेस काही अंतर गेल्यावर ती ईशान्य दिशेने वाहते.
भाटघरजवळच तिला डावीकडून येळवंडी नदी मिळते. भोरपासून इंगवली गावापर्यंत नीरा तीव्र वळणे घेऊन मग पुन्हा पूर्ववाहिनी होते. तेथे तिला उत्तरेकडून शिवगंगा नदी मिळते. नंतर नीरा पुणे जिल्ह्याची दक्षिण सीमा बनते.
सातारा जिल्ह्यातील खंडाळा व फलटण तालुक्यांतून वाहात गेल्यानंतर, ती सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात उत्तरेकडे वळते आणि पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका व माळशिरस तालुका यांची सरहद्द बनते. सुमारे १६० किमी. वाहात गेल्यानंतर पुणे जिल्ह्याच्या आग्नेयीस इंदापूर तालुक्यातील नरसिंगपूरजवळ भीमा नदीस मिळते. तेथे जवळच संगम नावाचे गाव आहे. पुणे बंगलोर या राष्ट्रीय महामार्गावर शिरवळजवळच या नदीवर पूल बांधला आहे.


भाटघर धरण 
भोर तालुक्यातील ब्रिटिशकालीन भाटघर धरण एकूण ४५ दरवाज्याचे स्वयंचलित धरण आहे.भाटघर धरण 23.75 टी.एम.सी. पाणी साठवण क्षमतेचे आहे. या धरणाचे पाण लोट क्षेत्र 336 चौ.कि.मी.लांबीचे असून धरणात 675.72 द.ल.घ.मी.एवढा पाणीसाठा होतो. हे धरण ब्रिटिश राजवटीतील असून धरणाचे संपुर्ण बांधकाम तोडीच्या दगडात घाणीच्या चुन्यात बांधलेले आहे. धरणाची महत्तम उंची 51 मीटर आहे तर लांबी एक कि.मी.पेक्षा जास्त आहे.

निरा देवघर धरण
निरा देवघर धरण 11.88 टी.एम.सी. पाणी साठवण क्षमतेचे असून धरणाचे बांधकाम वगळता मातीच्या भराव्यात बांधण्यात आले आहे. धरणाचे पाणलोट क्षेत्र 114.48चौ.कि.मी.असून लांबी 2430 मीटर आहे. उंची 58.50 मीटर आहे.
या धरणाच्या लाभ क्षेत्रात भोर, खंडाळा, फलटण व माळशिरस या चार तालुक्‍यांचा समावेश असून लाभ क्षेत्रात 41, 400 हेक्‍टर शेत जमीनी येतात. हे धरणाचे सारे पाणी कालव्यांद्वारे लाभ क्षेत्रात पोहचवायचे असले तरी ही कामे आज तरी अपूर्णच असल्याने निरा नदीत सरळ सोडून ते वीर धरणातुन पुढे सोडले जात आहे.


नेकलेस पोइंट

भोरेश्वर मंदिर